माखजन |वार्ताहर : पुण्यातील ख्यातनाम डॉ.अमोल गणेश सहस्त्रबुद्धे हे पब्लिक हेल्थ क्षेत्रातील अतिशय महत्वाची समजली जाणारी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ ही पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.
डॉ अमोल सहस्त्रबुद्धे यांनी वैद्यकशास्त्र व संशोधन क्षेत्रात जगात अग्रगण्य असणाऱ्या अमेरिकेच्या प्रतिष्ठित अशा जोहन्स हॉपकिन या विदयुापीठातून ही पदवी मिळवली. ही पदवी मिळवण्यासाठी ९० देशांमधून शेकडो विद्यार्थी प्रवेश घेत असतात.यश प्राप्त केलेल्या मुलांच्या पहिल्या २५० च्या यादीत डॉ.अमोल सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे.
डॉ.अमोल सहस्त्रबुद्धे हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उच्च पदावर कार्यरत आहेत.तर ते संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल चे ते माजी विद्यार्थी आहेत.त्यांच्या या यशाबद्दल संगमेश्वर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












