वेत्ये रोडवर हाडांचा सांगाडा : परिसरात खळबळ

सावंतवाडी : वेत्ये येथे हाडांचा सांगाडा दिसून आल्याची घटना मंगळवारी निदर्शनास आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा सांगाडा मानवी आहे का हे स्पष्ट झालेलं नाही. पोलीस अधिक तपास करत असून उद्या दुपारपर्यंत याच निदान होणार आहे. ही हाडे ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. वेत्ये रोडवर असलेल्या एका धाब्या शेजारी हाडांचे तुकडे दिसून आले. वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पहाणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.