Honoring the winning contestants who performed traditional costumes on behalf of MNS Guhagar
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार
गुहागर | प्रतिनिधी : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुका मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथीनुसार साजरी झालेल्या शिवजयंती निमित्त पारंपारिक वेशभूषा स्पर्धेतील स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.या स्पर्धेत वेशभुषा साकारणाऱ्या कु. जिजा प्रसाद पेंडुरकर, कु. राज्ञा राहुल जाधव, कु अक्षरा चांगाप्पा डुकरे,कु ज्योतिबा चांगाप्पा डुकरे, कु. सेजल राहुल दराखा,सौ प्रियांका जाधव , यांचा रोख पारितोषिक देऊन; सन्मान करण्यात आला.रॅली मध्ये सहभागी झालेल्या चिखली मांडवकरवाडी शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. चगप्पा त्बसवंत डुकरे यांनाही सन्मान चिन्ह देण्यात आले.याचबरोबर संरक्षण अधिकारी महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन श्रीमंती माधवी जाधव यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमंती माधवी जाधव तसेच वकील पुनम साळवी यांनी आलेल्या उपस्थिताना मार्गदर्शन केले. तसेच गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी वेशभूषा स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना विनोद जानवळकर, सुनील मूकनाक, सचिन जोयशी, प्रसाद विखारे राहुल जाधव, जानवळे ग्रामपंचायत सदस्य वैभवी जानवळकर उपस्थित होते.,