School children are getting poor nutrition
संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी – भरत सावर्डेकर
चिपळूण | वार्ताहर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत शासनाच्या मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारतर्फे जे पोषण आहार पुरविले जाते ते निकृष्ट दर्जाचे असते तरी याची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पालवण येथील सामाजिक कार्यकर्ते भरत सावर्डेकर यांनी केली आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार शाळेत देण्यात येणाऱ्या अन्नाचा तक्ता लावणे गरजेचे असताना अनेक शाळेत तो लावला जात नाही. शाळेत केवळ भात, बटाटा टाकून सालीच्या डाळीची पातळ आमटी किंवा वरण मुलांना दिले जाते. पोषण आहारात भाती नसते. जे अन्न दिले जाते ते खाण्याजोगे नसते. शासन मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे. शाळेत अन्न शिजविण्यासाठी ज्या महिला असतात त्यांना तुटपुंजे मानधन असते. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांकडूनच पैसे गोळा करतात. हा सारा प्रकार चीड आणणारा असाचा आहे. अनेक वेळा करपलेला भात व पातळ वरणच मुलांना दिला जातो याने मुलांचे काय पोषण होणार, असा सवालही सावर्डेकर यांनी व्यक्त केला असून शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्यांनी पालवण 1. शाळा नं. १ येथे भेट देऊन तेथील सर्व वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला असून त्याचा व्हिडिओही अधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याचे समजते.