Central Government Pensioners Association, Dodamarg taluka meeting concluded
दोडामार्ग | सुहास देसाई : सेंट्रल गव्हर्नरमेंट पेन्शनर्स असोसिएशनचा वार्षिक मेळावा दोडामार्ग हायस्कूल येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी उपस्थित पेन्शनर्सना असोसिएशनचे प्रमुख सल्लागार व माजी सचीव श्री एम्. डी. जोशी यांनी सद्य स्थितीत शासनाकडे पेन्शनरांचे विविध प्रश्र्न प्रलंबित असून अखिल भारतीय स्तरावरील संघटनेचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. वाढत्या वयात पेन्शनरांच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन निवृत्तीधारकांचा वैद्यकीय भत्ता वाढवावा यासाठीही असोसिएशन प्रयत्न करत आहे. फॅमिली पेन्शनरांच्या विविध समस्या यशस्वीपणे हाताळल्याने आमच्या अनेक महिलांना फार मोठा आधार मिळाला आहे आणि हे सर्व आपल्या असोसिएशनच्या एकजुटीनेच शक्य झाल्याचे प्रतिपादन जोशी यांनी केले.
असोसिएशनचे जिल्हा संघटनमंत्री अॅड. नकुल पार्सेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात असोसिएशनच्या वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. मालवण धुरीवाडा येथे असोसिएशनच्या स्वमालकीचे अद्ययावत कार्यालय कार्यरत असून जिल्ह्यातील पेन्शनरांच्या काही समस्या असल्यास कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन अॅड. पार्सेकर यांनी यावेळी केले तसेच असोसिएशनचे सभासद संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.यावेळी दोडामार्ग तालुक्याच्या विविध भागातून रेल्वे, पोस्ट, टेलीफोन,भारतीय सैन्य दल अशा विविध केंद्रीय आस्थापनेतून निवृत्त झालेले बहुसंख्य निवृत्तीधारक उपस्थित होते. उपस्थित निवृत्तीधारकांच्या काही समस्यांचे निराकरण यावेळी जोशी यांनी केले.मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री सुरेश पाटकर, श्री श्रीनिवास हडकर, श्री बी. जी. घाडी, श्री गणपत मसुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.