केंद्रीय अन्नप्रक्रिया जलशक्ती राज्यमंत्री श्री. प्रल्हाद सिंह पटेल यांचा दौरा
कामथे येथे ग्रामस्थांशी संवाद
दौऱ्यातील साधेपणाची सर्वत्र चर्चा
चिपळूण | संतोष सावर्डेकर : भारत सरकारचे केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री श्री प्रल्हाद सिंह पटेल हे लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत रायगड लोकसभा मतदारसंघातील भागांना भेट देण्यासाठी चिपळूण, गुहागर, दापोली तालुक्यांच्या दौऱ्यावर आले आहेत. 6 एप्रिल रोजी सायंकाळी मत्स्यगंधा एक्सप्रेस ने चिपळूणमध्ये आले. त्यानंतर चहापानासाठी हॉटेल रीम्झ येथे गेले असता तेथे त्यांनी वालोपे येथील स्थानिक भाजपच्या बूथ प्रमुखाच्या घरचा चहा हवा असा आग्रह धरला ,त्यावेळी तेथील बूथ प्रमुख श्री शिरकर यांनी घरातून चहा बनवून आणून त्यांना दिला .
त्यानंतर कामथे येथे भाजपा युवा मोर्चाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री संतोष मालप यांच्या घरी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली .तसेच तिथेच त्यांनी त्या भागातील भाजपच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तेथील स्थानिक सरपंच, उपसरपंच यांनी मुंबई गोवा महामार्ग संदर्भातील समस्या पटेल यांच्या समोर मांडल्या .यावेळी त्यांनी तात्काळ प्रांताधिकाऱ्यांना त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच ग्रामस्थांनी तेथील धरणाविषयी ची समस्या पटेल यांच्या कानावर घातली.
जमिनीवर मांडी घालून बसून श्री संतोष मालप यांच्या अंगणामध्ये सर्व भाजपच्या सहकाऱ्यांबरोबर रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेतला. वर्षभर विना कांदा लसूण असलेले जेवण ते जेवतात. कुठे देशभरात कुठे दौऱ्यात असले तरी हा नियम काटेकोरपणे पाळतात. 6 एप्रिल हाच भाजपचा स्थापना दिवस असल्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार तेथे त्यांनी एका भिंतीवर कमळाचे चिन्ह स्वतःच्या हाताने रंगवून पक्षादेशाची पूर्ती केली .यावेळीच भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान देखील करण्यात आला.लोकसभेमध्ये मध्यप्रदेश मधून विविध मतदार संघात मधून आत्तापर्यंत निवडून आल्यामुळे संघटनात्मक कौशल्यामध्ये त्यांची विशेष हातोटी आहे याची कल्पना त्यांनी घेतलेल्या संघटनात्मक आढावा बैठकीतून आली. केंद्रीय मंत्री असूनही एकंदर दौऱ्यामध्ये त्यांची असणारी साधी राहणे ही यावेळी चर्चेचा विषय ठरली.कापसाळ येथील सुकाई देवी यात्रोत्सवाला देखील त्यांनी भेट दिली.
यावेळी भाजपचे कोकण विभागीय संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील ,भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष केदार साठे,जिल्हा सरचिटणीस रामदास राणे ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप ,तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर ,शहराध्यक्ष आशिष खातू माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक परिमल भोसले , चिपळूण अर्बन बँक संचालक भाजपा पदाधिकारी रत्नदीप देवळेकर शहर सरचिटणीस राम शिंदे, शहर चिटणीस निनाद आवटे, विनायक वरवडेकर युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मंदार कदम,अजय साळवी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित होते.यानंतर दौऱ्यात सात एप्रिल रोजी गुहागर येथे भाजपाची संघटनात्मक आढावा बैठक तसेच जिल्ह्यातील ओबीसी संघर्ष समिती बरोबर बैठक आणि जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची आढावा बैठक होणार आहे.आठ एप्रिल रोजी दापोली दौऱ्यात दापोली भाजपची संघटनात्मक आढावा बैठक तसेच अन्नप्रक्रिया विषयाची निगडित उद्योजकांशी संवाद साधून शंका निरसन ते दापोली कृषी विद्यापीठात करणार आहेत.