शिवसेना युवासेनेच्या वतीने मालवणातील साहसी मुलांचा सत्कार

 

अमित खोत | मालवण : मालवण समुद्रकिनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी एक पर्यटक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत आल्याचे तेथे पोहण्याचा सराव करणाऱ्या मुलाने दिसले. त्या लहान मुलांनी त्या पर्यटकास पाण्याबाहेर आणले. समुद्रामध्ये बुडणाऱ्या पर्यटकाचे प्राण वाचवणाऱ्या त्या साहसी मुलांसाह त्या मुलांच्या प्रशिक्षकांचा सत्कार मालवण भरड दत्त मंदिर येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आला.

युवासेना मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने तसेच किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. शाल व श्रीफळ देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला.

प्रशिक्षक गवंडे सरांनी त्यांच्या पोहण्याच्या तालमीमद्ये मुले कशी तयार झाली हे सांगितले. तसेच युवासेनेची कौतुक थाप मुलांना प्रेरणा ठरेलं असे सांगितले. ही मुले मालवण तालुक्याच्या दृष्टीने अभिमान आहेत. मुलांनी आपली प्रगती करत राहावी. मालवण सिंधुदुर्ग युवासेना सोबत असल्याचे युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले.

या मुलांमध्ये वरद सापळे, रूद्र गांवकर, अंगद गांवकर, हर्ष कुबल पालक अरूण चोपडेकर, करुणा गांवकर शिवसेना पदाधिकारी माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवती सेना मालवण शहर प्रमुख प्रियांका मेस्त्री अन्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.