मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी मार्फत माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या श्री समर्थ मौनीनाथ एज्युकेशन कल्चरल ट्रस्ट मार्फत वैकुंठ रथ देण्यात आला आहे. आज 20 फेब्रुवारी दुपारी 12.00 वाजता
भारतीय जनता पार्टी मालवण तालुका कार्यालया मध्ये डॉक्टर सुभाष दिघे व मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या हस्ते वैकुंठ रथ लोकार्पण होणार आहे.
यावेळी लोकप्रतिनिधी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सर्व आघाडीचे पदाधिकारी ,यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन
भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.










