खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील धामणी येथील श्रीमान आर. जी.
काते।विद्यामंदिरमधील माजी विद्यार्थ्यांच्या
वतीने २२ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रशालेच्या प्रांगणात पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना
मोफत गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे. याचवेळी छत्र्यांसह शैक्षणिक साहित्यांचे वितरण देखील करण्यात येणार आहे.
गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता माजी विद्यार्थी संघ पुढे सरसावला आहे. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप बिरवटकर यांच्यासह संघाच्या सदस्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह गणवेश वाटपाचा निर्णय घेतला आहे. याचवेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळाही पार पडणार आहे.










