खेडमध्ये गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड

crime

 

खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील नगरपरिषद कर्मचारी वसाहतीच्या पाठीमागे एका झाडाखाली बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत ३,४२० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी सिद्धेश वैभव खामकर याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी पुन्हा गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर धाडी टाकण्याची मोहीम हाती घेतली
आहे. खामकर याला पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले.