राणे साहेबांना विजयी करणाऱ्या जनतेचे आभार
भाजपा महायुती नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मेहनतीचा हा विजय
माजी नगरसेविका ममता वराडकर व मोहन वराडकर यांनी व्यक्त केल्या भावना
मालवण | प्रतिनिधी : भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय म्हणजे कोकण विकासाचा विजय आहे. आगामी काळात कोकणचा गतिमान विकास होईल. राणे साहेबांच्या विजयासाठी मालवण शहर प्रभागात एकसंघपणे काम करणाऱ्या भाजपा महायुती नेते, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मेहनतीचा हा विजय असून मोठे मताधिक्य देणाऱ्या जनतेचेही आभार. असे मालवण नगरपरिषद माजी नगरसेविका ममता वराडकर व मोहन वराडकर विजयी भावना व्यक्त करताना स्पष्ट केले आहे.
ममता वराडकर म्हणाल्या, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला विजय झाल्याची भावना आहे. राणे साहेब आणि कोकण, राणे साहेब आणि कार्यकर्ता हे भावनिक नाते आहे. हे या विजयाने अधिक जवळ आले.
राणे साहेबांची उमेदवारी जाहिर झाल्या पासून जनतेने सुरवतीपासून पाठींबा व्यक्त केला. जनतेने हा विजय निश्चित करत विकासाला पाठिंबा दर्शवला. हे या निकालातून दिसून येते. असेही वराडकर यांनी सांगितले.
फोटो : ममता वराडकर
फोटो : मोहन वराडकर












