खेड मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत साजरा केला आनंद उत्सव.
खेड (प्रतिनिधी)कोकणवासी यांचे मी आभार मानतो कारण देशातला निकाल कमी-जास्त असला तरी संपूर्ण तळ कोकणात कोकणवासी यांनी मोदींच्या पाठी ठाम उभा असल्याचे चित्र निकालावरून स्पष्ट झाल्याचे शहर अद्यक्ष अनिकेत कानडे यांनी सांगितले
खेड भारतीय जनता पार्टी कडून संपूर्ण निवडणुकीचा निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यालयात सर्व भाजप प्रेमी नागरिक भाजपचे पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोकणातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले कोकणचे नेते नारायणराव राणे आणि सुनील तटकरे विजयी झाल्यानंतर खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी कार्यकर्त्यां समवेत जल्लोष केला
रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे विजय झाल्याचे घोषित होतात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे यांनाही विजयी घोषित झाल्याबरोबर संपूर्ण भाजप कार्यकर्ते यांनी खेड शहरात मिठाई वाटत फटाक्यांची चौका चौकात आतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला
यावेळी शहराध्यक्ष अनिकेत कानडे माजी नगराध्यक्ष आबा जोशी, संजय बुटाला, संजय विचारे, वैजेश सागवेकर, संतोष भागवत, नितांत तलाठी, मंदार आपटे, रोहन राठोड, उल्हास बाळ, सुहास सोहनी, ॲड. जाडकर, अविनाश माने, ओमकार पाटणे, मुन्ना बेन्दरकर, राजु केळकर यांसह अनेक नागरिक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राणे साहेब तुम आगे, बढो मोदी साहेबांचा विजय असो अशा घोषणा देत तीन बत्त्ती नाका, एस.टी.बस स्थानक, छत्रपती शिवाजी चौक, भरणे नाका आदि ठिकाणी फटके फोडण्यात आले









