खेड(प्रतिनिधी)गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या गणित प्राविण्य परीक्षेसाठी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज प्रशालेतील इयत्ता ५वी व ८वी चे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांचे द्वितीय स्तराच्या गणित प्रज्ञा या परीक्षेसाठी निवड झालेली होती
गणित प्रज्ञा परीक्षेत सुयश प्राप्त केलेले प्रमाणपत्र धारक विद्यार्थी पुढील प्रमाणे इयत्ता ५वी .यश प्रताप गजमल इयत्ता ८वी .ज्ञानेश्वरी शंकर नरूटे ,कार्तिकी केशव मुंडे ,.समृद्धी सचिन घाडगे ,.गौरी शैलेश गुणदेकर,आराध्य अनिरुद्ध आपटे ,आर्यन अजय कदम ,श्रेयस श्रीकांत चांदिवडे,सुरज भास्कर भोसले ,धनोज मिथुन पाटील
सर्व यशामध्ये शिक्षक, पालक, संस्था चालक यांनी उत्तम सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश संपादन करता आले. सदर विद्यार्थ्यांना सौ. प्रियसी दळवी व दामिनी महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.









