सावंतवाडी । प्रतिनिधी : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सावंतवाडी भाजपच्यावतीने तालुका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व जिल्हा चिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, विनोद सावंत, माजी नगरसेवक गुरु मठकर, सचिन साटेलकर, कास सरपंच प्रवीण पंडित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.











