साखरीनाटे येथे वीज पडल्यामुळे युवकाचा मृत्यू

 

जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे विज पडून तरूण मुबसम मलिक सोलकर (३२) याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. त्याच्या मृत्युने हळहळ व्यक्त् होत आहे.

मुबसम हा सौदी येथे शिपवर कामाला असल्याचे समजते. नुकताच तो परदेशातून तो गावी साखरीनाटे येथे आलेला होता . गुरूवारी दुपारी तो आपल्या घराशेजारी छोट्या होडीत काम करत असताना लगत पडलेल्या विजेच्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून मुबसम याचा उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे .

मुबसम याला दोन लहान मुली असून मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या आई-वडिलांचा तो मोठा मुलगा होता. त्याचे दोन लहान भाऊ शिक्षण घेत असल्याचे आहेत. मुबसम याच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.