खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मेटे पाटीलवाडी येथील पडवीमध्ये एका ४० वर्षीय प्रौढाने लाकडी आडयाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली
महेश सखाराम पंडीत असे त्या आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव असून कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन नायलॉनच्या दोरीने गळफास घेवुन मयत अवस्थेत मिळुन आला या प्रकरणी येथील पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे












