रत्नागिरी | प्रतिनिधी : बेदरकारपणे कार चालवून हाखंबा येथील चौपदरी करणाचे काम करणार्या कामगाराला धडक देत अपघात केला. यात कामगार हसन विक्रम सुवर्णकार (42,मुळ रा.बिहार) हा गंभिर जखमी झाला असून ही घटना शनिवार 25 मे रोजी मध्यरात्री 2 वा. मुंबई-गोवा महामार्गावरील तारवेवाडी फाटा येथे घडली आहे.
याप्रकरणी सिध्देश उर्फ बाळा अनंत देसाई (रा.हातखंबा, वेदांत बियर शॉपीचे मागे,रत्नागिरी) या कार चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात ठेकेदार जयंतीलाल घेवरचंद नानेचा (52,रा.पाली,रत्नागिरी) यांनी शुक्रवार 7 जून रोजी तक्रार दिली आहे. त्यानूसार, त्यांच्या इगल इन्फा इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत हातखंबा येथील रस्त्याचे चौपदरी करणाचे काम चालू आहे. या ठिकाणी त्यांचा कामगार हसन सुवर्णकाऱ़ हा सिमेंट काँक्रिट करणारे पेवर मशिनव्दारे काम करत होतो.
त्यावेळी सिध्देश देसाई आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (एमएच-43-एएल-3795) घेउन निवळी ते हाखंबा असा भरधाव वेगाने येत होता. तो चौपदरी करणाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी आला असता त्याचा कारवरील ताबा सूटला आणि त्याने पेवर मशिनला तसेच कामगार हसन सुवर्णकार याला धडक देत हा अपघात केला. यात हसनला गंभिर दुखापत झाली असून पेवर मशिनचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर सिध्देशने घटनास्थळाहून पळ काढला होता. याप्रकरणी त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 279,337,338 मोटार वाहन कायदा कलम 184,134/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










