राजिवडा येथे घरात झोपलेल्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञाताने लांबविले

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील राजीवडा येथे घरात झोपलेल्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र अज्ञाताने लांबवले. ही घटना शुक्रवार 7 जून रोजी पहाटे 2.45 वा. घडली.

 

याबाबत सुफिया अब्बास बुड्ये (75,रा.राजिवडा,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, शुक्रवारी त्या घरात झोपलेल्या असताना घराच्या पाठीमागील उघड्या दरवाजातून आत येत अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील 26.580 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.