सामाजिक कार्यकर्त्या विरजा कदम यांचे निधन 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगांव येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या विरजा वासुदेव कदम (६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अभिनय क्षेत्रात त्यांनी काम केले होते.

 

जिल्हा बँकेचे माजी संचालक विकास भाई सावंत यांच्या त्या भगिनी तर शासकिय ठेकेदार सिव्हील इंजिनिअर बबलू कदम यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मूलगे, मूलगी, सून, नातू, जावई असा परिवार आहे.