लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील इसवली पनोरे येथील शेतकऱ्यांना मोफत पावसाळी हंगामातील परसबाग भाजीपाला बियाणे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
कुणबी सेवा संघ लांजा व कुणबी सेवा संघ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर कुणबी सेवा संघ लांजाचे अध्यक्ष शांताराम गाडे, संघाच्या खजिनदार ॲड. स्मिता मांडवकर सदस्य प्रकाश जोशी, छात्रालय अधीक्षक अजय नेमण,पनोरे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नरसाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कुणबी सेवा संघ दापोलीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी भाजीपाला बियाणे उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता मांडवकर यांनी केले. परसबागेतील भाजीपाल्याचे महत्व स्पष्ट केले. स्मिता मांडवकर यांनी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. यानंतर अध्यक्ष शांताराम गाडे यांनी शेती बद्दल माहिती देताना भाजीपाला लागवडीविषयी माहिती दिली. कुणबी सेवा संघ लांजा तर्फे चालविण्यात येणारे कुलकर्णी काळे छात्रालया विषयी माहिती दिली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर उपस्थित तालुक्यातील शेतकऱ्यांना परसबागेतील भाजीपाला बी बियाणे यांचे वाटप करण्यात आले.











