खेड(प्रतिनिधी) येथील मदत ग्रुप खेड, चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने कळंब णी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सरबत वाटप करण्यात आले
यावेळी मदत ग्रुप खेड, चे अध्यक्ष श्री प्रसाद गांधी, दिनेश जाधव,चंद्रकांत शेलार, इंद्र कुमार रायका विनायक कदम यांच्यासमवेत अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. वर्धापन दिनानिमित्त मदत ग्रुप संस्थे तर्फे कळंबणी उपजिल्हा रुग्णालय मध्ये जाऊन सर्व रुग्णांना ज्यूस चे वाटप करण्यात आले.
मदत ग्रुप खेड ची स्थापना २०१३ ला झाली तिथ पासून मदत ग्रुप ने मदत कार्यचा वसा कायम ठेवला आहे रात्री अप रात्री घराबाहेर पडून आपल्या टीम सह मदत ग्रुप संकट काळात प्रशासना सोबत काम करत आहेत









