खेड(प्रतिनिधी) खेड सायकलिंग क्लब, खेड व खेड जनरलप्रक्टिशनर्स असो. यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जून हा सायकल दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने खेड येथील
श्री सिद्धी विनायक मंदिर, ते खारी, माळीवाडी या दरम्यान सुमारे ५ किमी अंतराची सायकल रॅली काढण्यात आली.
सदर रैलीसाठी प्रमुख पाहुणे डॉ. श्री. रामदास महाजन, पुणे, केजी पी ए प्रोजेक्ट चेअरमन डॉ. प्रसन्न बाळ, के सी सी अध्यक्ष विनायक वैद्य, पोलिस निरीक्षक, खेड श्री भोयर , तसेच सुमारे ५० सायकलस्वार त्यामध्ये शालेय विद्यार्थी- २०, पालक – ६, डॉक्टर्स असो. २२ सभासद, के सी सी चे -२४ सभासद, सायकलप्रेमी सहभागी झाले होते.
रॅली मार्गावर पोलिस स्थानक, खेड, तसेच के सीसी व केजीपीए स्वयंसेवकांमार्फत वाहतूक नियोजन करण्यात आले तसेच परतीच्या मार्गावर पाणी, केळी, प्रथमोपचार सुविधा करण्यात आली. रॅलीनंतर प्रमुख पाहुणे डॉ. महाजन यांच्याकडून सायकल देखभाल-दुरुस्ती, भ्रमंती, पर्यटन व निसर्ग संवर्धन यावर प्रबोधन करण्यात आले. के सीसी अध्यक्ष श्री वैद्य व डॉ. श्याम गिल्डा यांच्याकडून आभार मानण्यात आले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली. त्यामध्ये हॉटेल सौरभ चे मालक श्री. आबा जोशी यांचे योगदान लाभले यावेळी श्री. वैद्य यांनी सायकल वापरासोबत प्लास्टिक कचरा निर्मुलन व साक्षरता यावर प्रबोधन केले











