खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील मुळगाव व तळघर येथील जांभा खाणीत महावितरण ची वीज चोरून वापरल्याचा प्रकार महावितरण च्या भरारी पथकाने उघड केला या मध्ये तब्बल २६ ,लाख २४, हजार २३० रुपयाची वीज चोरी केल्या प्रकरणी तिघावर येथील पोलीस ठाण्यात ११ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार – फ्रेबुवारी २०२३ ते मार्च २०२४ चे मुदतीत मुळगाव, तळघर येथे घडला होता.
या प्रकरणी विजय राजेश धरमसारे ( उप-कार्यकारी अभियंता), भरारी पथक पेण यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार श्री. रामचंद्र भागुजी बुधर,. सचिन रामचंद्र बुधर व राकेश बुधर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील तिघांनी त्यांच्या मालकिच्या चिरेखानीच्या वीज पुरवठ्यासाठी वापरण्यात येणा-या वीज संचाची सील तोडुन व पी टी चे स्क्रु ढिले करुन अनधिकृतपणे वीजेची चोरी करुन वापर करुन १४ महिन्यापासुन (फ्रेबुवारी २०२३ ते मार्च २०२४ ) ८६२४६ युनिट्स विज चोरुन वापरली व त्याबाबतची १२,८९,८४० /-रुपयाची वीज चोरी केली तर तळघर मध्ये
देखील ७६०९४ युनिट्स विज चोरुन वापरून १३ लाख ३४ हजार ३९० रुपयांचे महावितरण कंपनीचे नुकसान केले आहे म्हणुन गुन्हा दाखल केला आहे.










