पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे तब्बल 8 हजार 713 अर्ज प्राप्त
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या 149 आणि पोलिस शिपाई चालक पदांच्या 21 अशा एकूण 170 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे तब्बल 8 हजार 713 अर्ज प्राप्त झाले आहेत.
यापमध्ये अनूसूचित जमातीची 10, विमुक्त जाती अ साठी 12, भटक्या जमाती ब साठी 4, भटक्या जमाती क साठी 5, भटक्या जमाती ड साठी 2, विशेष मागास प्रवर्गासाठी 2, इतर मागासवर्गीयांसाठी 4, एसईबीसीसाठी 15, इडब्ल्यूएससाठी 15, ख्ाुली पदे 59 अशा विगतवारीचा समावेश आहे.
शिपाई पदाच्या 149 पदांपैकी महिला 47, सर्वसाधारण 43, खेळाडू 8, प्रकल्पग्रस्त 8, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 23, अंशकालीन पदवीधर 8, पोलिस पाल्य 3, गृहरक्षक दल 8, अनाथ 1, बँडसमन 5 यांचा समावेश आहे. तर पोलिस शिपाई चालक पदाच्या 21 पदांपैकी अनूसूचित जाती 2, अनूसूचित जमाती 2, विमुक्त जाती अ 1, भटक्या जमाती ब 1, इतर मागासवर्ग 4, एसईबीसी 2, ईडब्ल्यूएस 2, खुला प्रवर्ग 7, अशा पदांचा समावेश आहे. तसेच कप्पीकृत आरक्षणामध्ये चालक पदासाठी सर्वसाधारण गटात 12, महिलांसाठी 7, माजी सैनिकांसाठी 2, अनाथांसाठी रिक्त पदांच्या 1 टक्का एवढी पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत.











