सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

२८ जूनपर्यंत अर्ज करावेत

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमार युवकांसाठी सहा महिने मुदतीचा सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम 1 जुलैपासून सुरु होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी युवकांनी 28 जून पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पेठकिल्ला, ता.जि. रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.

 

प्रशिक्षण कालावधी 1 जुलै ते 31 डिसेंबर 2024 (6 महिने) असणार आहे. यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. ( आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे ). उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे ).क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.

 

(विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.)
प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह रु.450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र. तर दारिद्र रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु. 100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.600/- मात्र असेल.(दारिद्र रेषेयाालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी पं.स. सांचा दाखला जोडावा)
राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येतील. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकते. अधिक माहितीसाठी जी. द. सावंत, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी,पेठकिल्ला, रत्नागिरी, ता. व जिल्हा- रत्नागिरी, पिन – 415612. ईमेल :- ftcrtn@gmail.com मोबाईल व whatsapp क्रमांक 9422371901 येथे संपर्क साधावा.