कणकवली : भारतीय चर्मकार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राणेंना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण, राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष अनिल चव्हान, जिल्हा अध्यक्ष सी. आर. चव्हाण, जिल्हा सरचिणीस संतोष जाधव, कोकण विभाग उपाध्यक्ष बाबल पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष देवरूखकर गुरुजी, देवगड अध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ चव्हान, जिल्हा सहसचिव अंकुश चव्हाण उपस्थित होते.









