मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत प.पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे २३ एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एस टी महामंडळाच्या विविध सवलती मिळणे साठी एन. सी. एम. सी. कार्ड कॅम्प महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिक, महिलानी उपस्थित राहावे. सोबत आधारकार्ड, मोबाईल आणणे आवश्यक आहे. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










