राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी तालुका मनसेचा उपक्रम

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुक्याच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

या शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष सौरभ पाटील, राजू पाचकुडे,. विशाल चव्हाण, सागर पावसकर, विभाग अध्यक्ष जयेश फणसेकर, अखिल शाहू, सोम पिलणकर, सचिन सांडीम आदीं पदाधिकाऱ्यांसह अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मेहनत घेतली. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून यावेळेस मनसेचे या लोकोपयोगी उपक्रमाबद्दल आभार मानण्यात आले.