कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात उन्नतील₹ साधेल – उद्योजक सचिन पाकळे

 

शासनाच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागा कडून खैर वृक्षाची रोपे मोफत मिळणार

गिरिजा देसाई : चिपळूण विभागीय वन अधिकारी

चिपळूण (प्रतिनिधी):– कोकणातील डोंगराळ जमीन मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस व जमिनीमध्ये खैर वृक्षाची होणारी वाढ लक्षात घेऊन येथील शेतकरी वर्गाने खैर वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास कोकणातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात उन्नती साधेल, असे मत प्रसिद्ध कात उत्पादक उद्योजक सचिन पाकळे यांनी व्यक्त करून कोकणातील शेतकरी वर्गास ओसाड जमीनीवर खैर लागवड करण्याचे आवाहन केले आहे.

खैर वनस्पती पासून कात उत्पादीत होतो. तसेच काताच्या पावडरचा लेदरसाठी तसेच कातापासून तयार होणारे टेनीन या उत्पादनाला परदेशात मोठी मागणी आहे. या खैराच्या झाडावर प्रक्रिया करून तयार केलेल्या उत्पादित माल मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात होत आहे. त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत आहे. जिल्ह्यात या लाकडाला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध आहे. खैर वनस्पतीची साल काढून त्याचा आतील गर सन २००० मध्ये १० रु. किलो विक्री होत होते. सध्या हे लाकूड (गर ) १०० कि.लो दराने विक्री होत आहे. खैर वनस्पतीची कोकणात मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास सदर लागवडीस उत्तेजन दिल्यास कोकणचा शेतकरी आर्थिक दृष्टीने संपन्न होईल. तरी चंदन वृक्षाप्रमाणे खैर वनस्पतीचा वनशेतीत समाविष्ट करून सदर खैर वनस्पतीची वाढ होण्यासाठी नव तंत्रज्ञाचा वापर करून शोध घ्यावा सदर नवंतंत्र विकसित झाले आणि कोकणातील जंगलात लागणारे आग वणवे थांबवल्यास तसे कायदे केल्यास कोकणातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

1985 दशकात 5 की. दराने जाणारे खैर लाकूड 1990 वर्षात 50 रु झाले. 2024 हाच खैर 80 रुपये दराने विक्री होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या वृक्षाच्या उत्पादनावर कौटुंबिक गरजा भागवत आहे. कोकणच्या शेतकऱ्याने मनात आणलं आणि खैर वृक्षाची लागवड करून जोपासले तर कोकणातील शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीच्या शोधात शहरात जाण्याची गरज लागणार नाही.

गिरिजा देसाई:- विभागीय वन अधिकारी चिपळूण

शासनाच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभागाकडून खैर वृक्षाची रोप मोफत पुरवली जाणार असून या विभागाकडून जिल्ह्यात पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शहरात व ग्रामीण भागात वृक्ष लागवडीचे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगून जिल्हातील ग्रामपंचायत कडून जून 2025 साठी खैर झाडाची मोफत रोपे पाहिजे असा ग्राम पंचायत ग्रामसभेचा ठराव करून मागणी केल्यास सामाजिक वनीकरण विभागात मार्फत शासनाकडून खैर झाडाची रोप तयार करून शेतकऱ्यांना मोफत रोपे पुरवण्यात असून ग्रामपच्यातच्या माध्यमातून मागणी करण्यात यावी असे आवाहन जिल्हातील सर्व ग्राम पंचायत सरपंच व ग्रामस्थांना चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी सौ. गिरीजा देसाई व उद्योजक सचिन पाकळे यानी केली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी केवळ आंबा काजू ,सुपारी या फळ बागा करण्यात लक्ष आहे. मात्र, ह्या बागा हवामान प्रदूषण वातावरणामुळे अडचणीत येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी स्पर्धेत टीकायचं असेल तर प्रवाहाबरोबर चालले पाहिजे तरच बाजारपेठेत पाय रोवता येणार आहेत. कोकणच्या मातीत रुजणार खैर झाड हे सोनं आहे. येथील खैर वृक्षा पासून मिळणाऱ्या उत्पादनात येथील लोकांचा उदरनिर्वाह होत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे खैर तोडला जात आहे. या वृक्षाची लागवड केली जात नाही. या खैर वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड करून जोपासना केल्यास कोकण देशात नव्हे तर जगात श्रीमंत होईल असं अभ्यासपूर्ण मत विभागीय वन अधिकारी चिपळूणच्या गिरिजा देसाई व्यक्त केले आहे.