चिपळूण (प्रतिनिधी)– येथील संत गोरोबा कुंभार विकास मंडळाचे काम आदर्शवत आहे.समाजासाठी वसतिगृह, पतसंस्था,भव्यदिव्य देखणी इमारत आणि भविष्यातील पिढी घडवण्यासाठी शाळा, इतके मोठे काम येथील विकास समितीने उभे करून वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.त्याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे.आशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी कुंभार समाजाचे कौतुक केले.
चिपळूण संत गोरोबा कुंभार विकास समितीने खेर्डी येथे भव्य देखणी अशी इमारत उभारली असून त्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी आमदार रमेश कदम,जयंतशेठ खताते,कुंभार गुरुजी तसेच कुंभार समाजाचे अध्यक्ष प्रकाशशेठ साळवी आणि समाजाचे सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शुभेच्छा देताना प्रशांत यादव म्हणाले समाजासाठी इतकी मोठी मेहनत घेऊन अल्पावधीत ही इमारत उभी करणे आश्चर्यकारक असेच आहे.सद्याच्या युगात चार दोन लोक एकत्रित ठेवणे कठीण असताना कुंभार समाज आजही संघटित असून तो जागरूक देखील आहे,हे कौतुकास्पद असल्याचे प्रशांत यादव म्हणाले.
यावेळी माजी आमदार रमेश कदम,जयंतशेठ खताते यांनी देखील संत गोरोबा कुंभार विकास मंडळाच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिले.अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी प्रास्ताविक करताना मंडळाच्या कामाचा आढावा सादर करून समाजाच्या कामासाठी आता तरुणांनी पुढे यावे असे आवाहन केले.












