चिपळूण (प्रतिनिधी), : तालुक्यातील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेज ऑफ सायन्स, सावर्डे या शाळेने सीबीएसई बोर्डाच्या इ. दहावी व बारावी च्या शालांत परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करून घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याला भाभा अनुसंशोधन केंद्र, मुंबई येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. आसावरी ढवळे प्रमुख पाहुण्या लाभल्या.
माध्यमिक शालांत परीक्षेत तन्मय भंडारी यांने ९७.४०% गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तसेच त्याने गणित, संस्कृत व सामाजिक शास्त्र या तीन विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. तन्मयला प्रथम क्रमांकासाठी विविध पारितोषिके मिळून रोख रु. १८७५०/- रकमेच्या बक्षिसाने गौरविण्यात आले.
शाळेत ९७.२०% गुण प्राप्त करून मुलींमध्ये पहिला क्रमांक संपादित केलेल्या श्रावणी राजेशिर्के या विद्यार्थिनीला विविध पारितोषिके मिळून रोख रु. २४२५०/- रकमेची बक्षिसे प्रदान करण्यात आली.
प्रशालेतील सासवी मिश्रा या विद्यार्थिनीने ९५.४०% गुण प्राप्त करून मुलींमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या प्रित्यर्थ तिला पारितोषिक रु. ३५००/- ने गौरविण्यात आले.
इंग्रजी विषयात सर्वाधिक ९५ गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थिनी श्रावणी राजेशिर्के व सासवी मिश्रा यांना विभागून रोख रु. १४०००/- पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. संस्कृत विषयात तन्मय भंडारी, श्रावणी राजेशिर्के, स्वरूपा हेंबाडे, वेद वारे व सृष्टी तेटांबे या पाच विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना विभागून रोख रु. ८६५०/- पारितोषिकाने गौरविण्यात आले. हिंदी विषयात सर्वाधिक ९८ गुण प्राप्त केलेला विद्यार्थी रुद्रसिंह यादव याला रोख रु. ८०००/- रकमेचे बक्षिस प्रदान करण्यात आले.
गणित व सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून अव्वल ठरलेला विद्यार्थी तन्मय भंडारी याला गणितासाठी रोख रु. १११५०/- व सामाजिक शास्त्रासाठी रु. ७०००/- पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. तसेच विज्ञान विषयात सर्वाधिक ९५ गुण मिळविणाऱ्या श्रावणी राजेशिर्के या विद्यार्थिनीला पारितोषिक रु. ८०००/- ने गौरविण्यात आले.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातून ९१.६०% गुण मिळवून प्रथम आलेला विद्यार्थी मोहम्मद हादी सलीम काझी, द्वितीय क्रमांक अनामेय देवरुखकर ८८.६०% आणि तृतीय क्रमांक ऋचा शेंबेकर व अंजली सुरेश ८२.२०% या विद्यार्थ्यांना प्रशालेतर्फे रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगताद्वारे शाळेबद्दल कृतज्ञता व सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ. आसावरी ढवळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सातत्याने कष्ट केल्याशिवाय यशाची पायरी गाठता येत नाही. विद्यार्थ्यांनी चौकस बुद्धीने अभ्यास करावा; शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे व यशाने हुरळून न जाता पुढील शैक्षणिक प्रगती साधावी. पालकांनीही विद्यार्थ्यांचा कल विचारात घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांचा ओढा हा आय.टी. किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा नवीन तंत्रज्ञानाकडे जास्त असतो. विज्ञान, गणित आणि कला या शाखा समान महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावर उदाहरण म्हणून त्यांनी वैज्ञानिक आईन्स्टाईन आणि विख्यात इंग्रजी कवी विलियम वर्ड्सवर्थ यांचं उदाहरण दिले. या दोन्ही महान व्यक्तींचा बुद्ध्यांक सारखाच म्हणजे १५० होता असे एका परीक्षणात आढळून आले. त्यामुळे कुठल्याही शाखेला कधीच कमी लेखू नये असे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी देशाचा गौरव वाढेल अशी कामगिरी करावी व एक चांगला माणूस म्हणून पुढे नावारुपाला यावं असे सांगून त्यांनी पुन्हा यशस्वीतांचे अभिनंदन केले.