खेड(प्रतिनिधी)खेड शहरातील महाड नाका येथील लाला कडीया सोसायटी येथे पार्क करून ठेवण्यात आलेली वँगनर कार एकाने चोरून नेल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तब्बल वर्षभरानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिर सईद परकार रा. महाडनाका ता. खेड असे त्या गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे ७ डिसेंबर २०२३ या कालावधी घडला होता. सुमारे ५ लाख रुपये किमतीची राखाडी रंगाची चार चाकी कार गाडी क्र. एम.एच.०१ डी, यु- ७५८५ अमिर सईद परकार याने चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











