संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा येथील जाधववाडीमध्ये बिबट्याने हल्ला केला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. अमित जाधव असे या तरुणाचे नाव असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जाधववाडी येथे अमितच्या घराचे काम सुरू आहे. ते पाहण्यासाठी अमित सकाळी तेथे गेला. त्यावेळी घराजवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात अमितच्या डोक्याला तसेच हाताला दुखापत झाली आहे. आरडाओरडा झाल्याने बिबट्या तेथून पळून गेला. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अमितला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.











