जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी मार्फत जागतिक योग दिन उत्साहात साजरा

मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी श्री. सुनिल एस. गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी चे सचिव श्री. निखील ग. गोसावी व इतर न्यायिक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी व पतंजलि योग समिती यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक २१.०६.२०२४ रोजी सकाळी ६ ते ८ या वेळेत देसाई बँक्वेट, हॉटेल विवेक मागे, माळनाका, रत्नागिरी येथे जागतिक याेगदिन साजरा करण्यात आला. यावेळी मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी श्री. सुनिल एस. गोसावी यांनी योग दिनाचे महत्व समजावून सांगताना भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.

 

 

अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्वीकारला नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा असे सर्वाना आव्हान केले.
सदर कार्यक्रमाला श्री. विद्यानंद जोग अध्यक्ष, पतंजलि योग समिती, श्री अविनाश तथा भाऊ शेटये, जिल्हाध्यक्ष अधिवक्ता परिषद रत्नागिरी कोंकण प्रांत इ. मान्यवर उपस्थित होते.