सदिच्छा फाउंडेशन मार्फत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

लांजा (प्रतिनिधी) सदिच्छा फाउंडेशन च्या वतीने
पालघर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.
लांजा तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र असलेल्या सचिन गुंडये यांनी सदिच्छा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील केईम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोफत टिफिन दिले जातात.

 

फाउंडेशन च्या सदस्य असलेल्या व मुंबई पोलीस दलात काम करत असलेल्या सौ. स्वप्नश्री शिंदे व स्वप्नील शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून
पालघर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सदिच्छा फाउंडेशन चे संस्थापक /अध्यक्ष सचिन गुंडये,ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षक वर्ग आणि सदिच्छा फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते.