रत्नागिरी : वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी सीईटी) निकाल लागला असून, यात नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातील २, तर नवनिर्माण हाय या सीबीएससी बोर्डाच्या ५ मुलांनी आणि घवघवीत यश मिळविले आहे.
राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी अनिवार्य केली आहे. ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १६ जूनला सायंकाळी जाहीर करण्यात आला. यात नवनिर्माण हायमधील स्मित नाईक याने पीसीएम ग्रुप ९६.९६ टक्के गुण मिळवले. अभिप्सा साहू हिने पीसीबी ग्रुपमध्ये ८९.७४ टक्के, सुहानी पाटील हिने पीसीबी ग्रुपमध्ये ९५.५० टक्के, दीया खातू हिने पीसीबी ग्रुपमध्ये ८९. ४० टक्के, सोहम पानगले याने पीसीएम ग्रुपमध्ये ९७.५६ टक्के गुण मिळवले. नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातील स्वरूप रेंदाळकर पीसीएम ग्रुपमधून ९८.५० टक्के, तर सोहम पानगले पीसीएम ग्रुपमधून ९७.५६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे.
नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










