लांजा येथे बुधवारी १२ एप्रिल रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन

Google search engine
Google search engine

Hosting an Iftar Party on Wednesday 12th April at Lanza

लांजा पोलीस ठाणे आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

लांजा | प्रतिनिधी : लांजा पोलीस ठाणे आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता सय्यद चांदशहा बुखारी दर्गा लांजा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
या इफ्तार पार्टीला प्रमुख अतिथी म्हणून लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे तसेच लांजा तहसीलदार प्रमोद कदम, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक नाईक तसेच जमातूल मुस्लिम लांजाचे अध्यक्ष शौकत नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते महंमद रखांगी, माहिती अधिकार महासंघाचे कार्याध्यक्ष रमजान गोलंदाज, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष परवेझ घारे, लांजा तालुका मराठा संघाचे सुभाष राणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.