अमित खोत | मालवण : आंतरराष्ट्रीय योग दिन अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
मालवण पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजयज गोसावी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी योगाचे महत्व विशद करून योगासनाची प्रात्यक्षिके दाखविली. योगासने करताना मधुर संगीताचा वापर करून प्रात्यक्षिके केल्याने मुलांनी योगासने करण्याचा अधिक आनंद लुटला. इयत्ता दहावीतील विद्यार्थी कुमार तेंडोलकर याने या कार्यक्रमाविषयीचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशालेतील पाचवी, दहावी पर्यंतची सर्व मुले व प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक संजय गोसावी यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर यांच्या वतीने गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. योग दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.











