*तुल्यबळ विधानसभा लढतीत गेले 10 वर्ष सामाजिक कार्यात आपली छाप पडत असलेल्या युवा उमेदवाराची एन्ट्री*

 

 

दापोली तालुक्यातील सुपूत्र संतोष अबगुल यांचा संवाद मेळावा यशस्वी

*दापोली l प्रतिनिधी*- लोकसभा निवडणुक संपन्न होताच आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कोकण हा सेनेचा नेहमी बालेकिल्ला राहिलेला आहे. यंदा मात्र रायगड पासुन सिंधुदुर्ग पर्यत शिवसेनेचा धनुष्यबाण मात्र दिसून आला नाही. विधानसभेला महाविकास आघाडी व महायुती यामध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच जो- तो मतदारसंघावर आपापला दावा सांगत आहेत.

 

दापोली विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने खेड-दापोली- मंडणगड हे तीन तालुके येत आहेत. या तालुक्यात सद्यस्थितीत उद्धव सेनेकडुन माजी आ. संजय कदम, शिंदे सेनेकडून विद्यमान आ. योगेश कदम यांची तिकीटे जवळजवळ फायनल समजली जात आहेत.

यावेळी मात्र या दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये तिसरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहे तो म्हणजे संतोष अबगुल, गेले 10 वर्ष सामाजिक कार्यात आपली छाप पडत असलेल्या युवा उमेदवाराची विधानसभेच्या माध्यमातून एन्ट्री होणार आहे. सामाजिक कार्य करीत असताना मुंबई सारख्या महानगरात केईएम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल यांसारख्या रुग्णालयात स्वतः चे रुग्णसेवक 24 तास मोफत सेवा, मोफत टिफिन सेवा, सरकारी कामात मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मदत तसेच दापोली-खेड-मंडणगड येथील ग्रामिण भागातील सरकारी हॉस्पिटल, ब्लड स्टोअरेज, वालावलकर रुग्णालय येथे रुग्णांसाठी मदत यांसारखी अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करत असतात विधानसभा मतदारसंघावर खेड तालुक्याचा वर चष्मा राहिला आहे येथे दहा वर्षात दापोली मतदार संघ हा विकासकामाबाबत पिछाडीवर गेला असल्याचे सांगत दापोली आपण आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे संतोष अबगुल यांनी सांगितले आहे. केवळ रस्ता, पाखाड्या, समाजामध्ये यातच मतदारांना गुंतवून ठेवून येथील राजकारण खेळले जात असून आगामी काळात दापोली मतदारसंघाचा शाश्वत विकास आपण करणार असल्याचे आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात त्यांनी बोलताना सांगितले.