दापोली | प्रतिनिधी: दापोली शहरातील एका सोसायटीच्या पार्किंग मध्ये उभी केलेली चारचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मासूम इलीयास शेख हे दापोली शहरातील फॅमिली माळ येथिल एका सोसायटीत राहत असून त्यांनी २५ जुलै रोजी त्यांची चारचाकी क्रमांक एमएच.०८. झेड.७२७३ हि सोसायटीच्या पार्किंग मध्ये उभी केली होती. दुसर्या दिवशी म्हणजे २६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता ते कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी गाडी जेथे ठेवली होती तेथे आले असता त्यांना त्यांची चारचाकी तेथे आढळून आली नाही.
त्यांनी परिसरात गाडीचा शोध घेतला मात्र त्यांना ती सापडली नाही त्यामुळे अखेर त्यांनी ४ लाख ४८ हजार रुपये किमतीची गाडी चोरीला गेल्याची तक्रार दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून दापोली पोलीस स्टेशन मध्ये अज्ञाता विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.












