ॲड. दिलीप नार्वेकर व ॲड. अनिल निरवडेकर यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर वेधले लक्ष

सावंतवाडी न्यायालयाच्या नूतन इमारती संदर्भात पाठपुरावा करण्याचीही मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कै. भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेजचे चेअरमन ॲड. दिलीप नार्वेकर व ॲड. अनिल निरवडेकर यांनी भेट घेतली.

यावेळी ॲड. दिलीप नार्वेकर यांनी सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत त्यांचे लक्ष वेधले. तसेच यावेळी ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. दिलीप नार्वेकर यांनी सावंतवाडी न्यायालयाच्या प्रलंबित नूतन इमारती बांधणी संदर्भात पाठपुरावा करण्याचीही मागणी केली.

Sindhudurg