घे भरारी फाउंडेशनतर्फे सांगेलीत मोफत आरोग्य शिबिर 

 

 

शिबिरात १०० हून अधिक जणांची तपासणी : मोफत औषध पुरवठा

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील घे भरारी फाउंडेशन, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, कुडाळ आणि जिजाऊ बचत गट सांगेली यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या सांगेली या गावात नुकतेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. खेड्यापाड्यातील गरीब जनतेला विशेषत: महिलांना आरोग्याच्या विविध सुविधा पुरविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात सुमारे १०० जणांनी आपली तपासणी करून घेतली. त्यांना आवश्यक असलेली मोफत औषधे सुद्धा पुरविण्यात आली. या शिबिरात रक्ताच्या विविध चाचण्या , त्याचबरोबर डोळ्याची चिकित्सा ,जनरल चेकअप , दातांची आरोग्य तपासणी आणि घ्यावयाची काळजी त्याचबरोबर विशेषत: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयाची सविस्तर माहिती देण्यात आली.

अशा प्रकारे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरा बद्दल सांगेली ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने घे भरारी फाउंडेशनचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. मोफत औषधे पुरविण्यासाठी डॉ .राजेश गुप्ता डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर डॉ.राजेश नवांगुळ डॉ.रेवण खटावकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

जनरल तपासणीसाठी डॉ. सतीश सावंत, डॉ.शेखर कार्लेकर , डॉ. श्रुती सावंत, सावंतवाडी त्याचबरोबर दातांच्या तपासणी आणि आरोग्यासाठी डॉ .विनय सूर्यवंशी आणि डोळ्यांच्या तपासणी आणि उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शन नॅब हॉस्पिटल सावंतवाडीच्या डॉ. स्नेहल सिंग यांनी केले .

यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कुडाळ च्या वतीने लॅब टेक्निशियन प्रशांत जाधव यांचे रक्ताची तपासणी करण्यासाठी बहुमूल्य सहकार्य लाभले. या सर्वांचे सांगेली गावाच्या वतीने आणि घे भरारी फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यानंतरही दरवर्षी गावातील जनतेच्या आरोग्यासाठी असे शिबिर आयोजित करावे असे मत गावातील प्रतिनिधींनी व्यक्त केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी मेघना राऊळ यांनी केले तर आभार प्रदर्शन घे भरारी फाउंडेशनच्या संचालिका मोहिनी मडगावकर यांनी केले.

या कार्यक्रमाला घे भरारी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष मोहिनी मडगावकर , अध्यक्षा गीता सावंत, उपाध्यक्षा शारदा गुरव , सेक्रेटरी मेघना राऊळ, खजिनदार मेघना साळगावकर, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कुडाळ च्या संचालिका सुश्मिता नाईक, रिया रेडीज ,रेखा कुमटेकर , स्वप्नाली कारेकर , वैष्णवी बांदेकर संध्या पवार , सलोनी वंजारी उपस्थित होत्या. त्याचबरोबर शालेय समिती चे अध्यक्ष सागर सांगेलकर, सांगेली गावचे उपसरपंच संतोष नार्वेकर जिल्हा परिषद चे माजी सभापती पंढरीनाथ राऊळ, आनंद राऊळ बचत गटाच्या अध्यक्षा आकांक्षा कीनळोस्कर , आरोग्य सेविका प्रियांका राऊळ, सौ. डोईफोडे असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.