खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील चाकाळे-कोळकेवाडी येथील २८ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे. प्रार्थना नितीन खेडेकर असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे.
ती घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली. घरी न परतल्याने तिचा नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला पण ती सापडली नाही. अखेर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.










