खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील शिवफाटा येथे शनिवारी दुपारी २च्या सुमारास रास्त दराच्या धान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. नगर परिषदेच्या अग्निशमक दलातील कर्मचारीही तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य केल्याने नुकसानीचा धोका टळला.
रास्त दराच्या धान्याचा भरलेला ट्रक (एम.एच.०११/ए.एल.६९१८) महामार्गावरून मार्गस्थ होत असताना शिवफाट्यानजीक ट्रकच्या मागे खालील बॅटरीच्यावरती अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक तातडीने थांबवला. नजीकचे ग्रामस्थ व वाहनचालक घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली परिषदेच्या अग्निशमक केंद्रातील फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन प्रणय रसाळ, प्रणव घाग, वाहनचालक गजानन जाधव, विद्याधन पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती









