चिपळूण (वार्ताहर): खेड पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्थेचे यशवंत विद्यालय कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालय धामणंद येथे टच फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या विभागातील या विद्यालयात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षिणक साहित्य देण्याचे उत्तम कार्य टच फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांनी
यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, स्कूल बॅग, कंपास, रेनकोट अधिक शैक्षणिक साहित्य प्रफुल्ल बाजीराव पालांडे यांच्यावतीने देण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंतराव पालांडे, सचिव संदीप म्हापदी, सखाराम पालांडे संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी सकपाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सावंत यांनी केले. सगळ्यांच्या आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











