डीबीजेमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील डीबीजे महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांकडून सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रा.विनायक बांद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवीयत्री होत्या. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारखी अनेक महत्वाची कार्ये त्यांनी केले. त्यांच्या या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा प्रा.विनायक बांद्रे यांनी आपल्या मनोगतामध्ये घेतला.

यावेळी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापटप, उपप्राचार्य डॉ. एम.एस. चांदा, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नामदेव तळप, पर्यवेक्षिका सौ. स्नेहल कुलकर्णी, प्रा.एस.के.जाधव, प्रा.सौ.कांचन तटकरे,प्रा.सौ दीशा दाभोळकर, प्रा.विलास जोशी, प्रा.प्रेमकुमार शिवगण, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.अरुण जाधव, एनएसएस सल्लागार प्रा.सप्नील साडविलकर, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक श्री.विजयेंद्र जाधव व बहुसंख्य एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.