‘कोकण पदवीधर’च्या निवडणुकीत दुपारी 3 वाजेपर्यंत 48% मतदान

 

रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदार संघासाठी सुरु झालेल्या मतदानामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 48टक्के मतदान झाले आहे.

भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रमुख लढत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदार संघात 48 % इतके मतदान झाले होते. त्यामध्ये समाविष्ट पालघरमधे 46.77%, ठाणे जिल्ह्यात 45.54%, रायगड जिल्ह्यात 48.54%, रत्नागिरीमध्ये 49.54% तर सिंधदुर्ग जिल्ह्यात 59.52 % मतदान झाले आहे.

 

तर याच निवडणूक प्रक्रियेतीलमुंबई पदवीधर मतदार संघासाठी 3 वाजेपर्यंत 45.90 % तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी 3 वाजेपर्यंत 61.44 % मतदान पार पडले आहे.