कीर्तनाची गोडी टिकून राहावी यासाठी सर्वतोपरी मदत करणार : विशाल परब

Google search engine
Google search engine

Will do everything possible to preserve the sweetness of kirtana: Vishal Parb

कीर्तन महोत्सवात विशाल परब यांचा सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री सद्गुरू स्वामी समर्थ सेवा मठ माडखोल ट्रस्ट व श्री सद्गुरू स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट डोंगरपालच्यावतीने आयोजित किर्तन महोत्सवाचे उद्घाटन विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी विशाल परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वंदनीय महाराज, प्रमोद सावंत यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवनात मोक्ष व मनःशांतीसाठी कीर्तन प्रवचनाची गरज आहे. भजन कीर्तनाने मन प्रसन्न होते. आजच्या दूरदर्शन व इंटरनेटच्या जमान्यात कीर्तनाची गोडी तशीच टिकून आहे. किर्तनाचे हे महात्म्य असेच टिकून राहिले पाहिजे यासाठी आपण सर्व कीर्तन मंडळीच्या पाठीशी ठामपणे उभा असून विशाल सेवा फाऊंडेशन सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी ग्वाही देत मदतीचा हात विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांनी दिला. यावेळी भक्तमंडळी तसेच स्थानिक ग्रामस्थ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sindhudurg