खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाच्या अशा कशेडी बोगद्याला गळती लागल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर बोगद्याच्या सर्वे करण्याच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे. यातीलच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता श्री संतोष शेलार यांनी बुधवारी कशेडी येथील बोगद्याची पाहणी केली.
यावेळी या बोगद्याला सात ठिकाणी गळती लागल्याची त्याने सांगितले. ही गळती आम्ही थांबणार आहोत. आम्ही जिओ लॉजिकल पद्धतीने ही सर्व गळती थांबवणार आहोत असे ते म्हणाले.
या बोगद्यातील खडकाच्या वरच्या बाजूला यापूर्वी विहिरी आणि छोटे नाले होते. त्यातील हे पाणी खाली येत असल्याचे त्यांनी सांगितले हे सर्व काम लवकरच पूर्ण करू असे ते म्हणाले.










