Condolences to goldsmith Umesh Chodankar MOTHER
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी सालईवाडा येथील रहिवासी सुरेखा वसंत चोडणकर (वय ९०) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. सावंतवाडी शहरातील सर्वात जुने सुवर्णकार कै. वसंत चोडणकर यांच्या त्या पत्नी होत. तर सुवर्णकार उमेश व संतोष चोडणकर यांच्या त्या मातोश्री तर ॲड. सुभाष पणदुकर यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.